Wednesday, March 14, 2012

विकास गट बनला स्वयंरोजगाराचे साधन

ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या महिलांसाठी सुवर्ण जयंती ग्रामस्वरोजगार योजना ही मोठा आधार बनली आहे. गावातील दारिद्र्यरेषेखालील असंघटीत महिलांनी संघटन करुन बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करुन आर्थिक समृद्धीचा मार्ग शोधला आहे.

भंडारा जिल्ह्यातील जंगलव्याप्त परिसराला लागून असलेले डव्वा या गावातील १० महिलांनी एकत्र येऊन ३० जानेवारी २००३ रोजी सुवर्ण जयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत विकास स्वयंसहाय्यता बचतगटाची स्थापना केली. अध्यक्षपदी सुनंदा डोंगरे व सचिव म्हणून दुर्गा बोंद्रे यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आली. ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा या संस्थेच्या संघटीकांनी या गटाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. महिन्याकाठी बचतगटातील सर्व महिलांनी प्रत्‍येकी २५ रुपये मासिक बचतीला सुरुवात केली. अंतर्गत कर्ज व्यवहारामुळे कौटुंबिक अडचणी सोडविण्यास त्यांना मदत झाली.

बचतगटातील सुमन बोरकर या महिलेची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाकीची. नवरा बायको दोघे शेतमजूर. घरी ३ मुले व १ मुलगी असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांना नेहमी उपस्थित व्हायचा.

डिसेंबर २००४ ला बचतगटाचा अंतर्गत कर्जव्यवहार बघता धारगांव येथील भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विकास गटाला मध्यम मुदतीचे २ लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले. इतर महिलांप्रमाणे सुमनताईला २६००० रुपयांचे कर्ज मिळाले. त्‍यामधून त्यांनी २ म्हशी घेऊन दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. या व्यवसायात सुमनताईला कुटुंबातील सदस्यांचा हातभार लागला. या व्यवसायात बऱ्यापैकी प्रगती होत असल्यामुळे त्यांनी आणखी दोन म्हशी घेतल्या. दुग्धव्यवसायातून महिन्याकाठी २८०० रुपये नफा होऊ लागल्याने त्यांनी मोलमजुरीस जाणे बंद केले आणि दुग्ध व्यवसायाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत करुन आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला. विविध प्रशिक्षणातून क्षमता व कौशल्यवृद्धी होण्यासही मदत झाली.

पूर्वी चारचौघीमध्ये न बोलणाऱ्या सुमनताई आता ग्रामसभेत गावाच्या समस्या तसेच महिलांचे प्रश्न मांडू लागल्या आणि गावाच्या विकास कामात आपले योगदानही देऊ लागल्या. विकास स्वयंसहाय्यता बचतगटाने सुमनताईला स्वयंरोजगार तर प्राप्त करुन दिलाच सोबत त्यांची एक कार्यतत्पर महि

No comments:

Post a Comment