Thursday, March 29, 2012

अकरावी विज्ञान शाखा सामायिक प्रवेश पूर्वतयारी

मार्च २०१२ मध्ये इ. १० ची परीक्षा दिलेल्या व इ.११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या / घेतलेल्या अनुसूचित जाती/नवबौध्द विद्यार्थ्यांना IIT,JEE,AIEEE व तत्सम अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सुवर्ण संधी असून IIT-ian's PACE या संस्थेमार्फत IIT,JEE,AIEEE व तत्सम अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी करुन घेण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जामध्ये खालील बाबींचा समावेश करावा.

१अर्जदाराचे नाव व पत्ता २ अर्जदाराची जन्मतारीख व वय, ३) दहावीची परीक्षा कोणत्या शाळेतून दिली त्या शाळेचे नाव ४) जात/पोटजात (सक्षम अधिकारी यांचा जातीचा दाखला जोडावा) ५) कुटुंबाचे सर्वमार्गांनी मिळणारे सन २०१०-११ चे वार्षिक उत्पन्न (सक्षम अधिकारी यांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा) ६) इयत्ता ८ वी मध्ये विषयवार मिळालेले गुण व टक्केवारी (गुणपत्रिका जोडावी) ७) इयत्ता ९ वी मध्ये मिळालेले विषयवार गुण व टक्केवारी (गुणपत्रिका जोडावी) ८) दुरध्वनी क्रमांक/मोबाईल क्रमांक, ई-मेल आय.डी.

विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमार्फत करण्यात येणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मुंबई येथे निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य पुरविण्याची व्यवस्था सामाजिक न्याय विभागामार्फत विनामुल्य करण्यात येईल. तसेच इयत्ता ११ वी मध्ये मुंबई येथील महाविद्यालयात प्रवेश देण्याची व प्रशिाक्षणाची व्यवस्था IIT-ian's PACE या संस्थेमार्फत करण्यात येईल.

पात्रतेचे निकष :

• मार्च २०१२ मध्ये इ.१० वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले व इ.८वी ९ वी मध्ये गणित व विज्ञान या विषयांमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळालेले विद्यार्थी प्रवेश परीक्षेकरीता अर्ज करु शकतील.

• विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

• विद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौध्द असावा.

• एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्यामध्ये सर्वसाधारणपणे ३० मुले आणि २० मुलींचा समावेश असेल. या संख्येमध्ये निवड चाचणी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणानुसार बदलही होऊ शकतो.

निवड प्रक्रिया :

संपूर्ण महाराष्ट्रात रविवार दिनांक ८ एप्रील २०१२ रोजी IIT-ian's PACE संस्थेमार्फत प्रवेश परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येईल.

• सदर परीक्षेस कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन शुल्क घेण्यात येणार नाही.

• परीक्षेचे केंद्र/ठिकाण खालीलप्रमाणे आहे. प्रवेश परीक्षा इ.१० वी च्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.

• प्रवेश परीक्षेतील निकालास ५० टक्के व ८ वी व ९ वीच्या टक्केवारीस प्रत्येकी २५ टक्के (वेटेज)गुण देऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.

परीक्षेचे केंद्र /ठिकाण :
• ४०१, ४था माळा, शॉपर्स पॉईंट, एस.व्ही.रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५८ संपर्क : २६२४५२२३/०९/३५७/६५७
• ६०१, ६ वा माळा, अगोरा बिझनेस प्लाझा, मॅकडोनाल्डसच्या वर, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०००९२
• ३ रा माळा, राधाकृष्ण अपार्टमेंट, वाचनालय मार्ग, दादर (पश्चिम) मुंबई ४०००२८ संपर्क : २४३६३७१३/९२२३९०१५८३
• पहिला माळा, अमृता सदन, सेक्टर-२२, नेरुळ (पश्चिम), मुंबई ४००७०६ संपर्क : २७७२०१५२/९००४३१२५५७
• ३ रा माळा, कच्छीभवन, जैन मंदिराजवळ, आय.आय.टी.समोर, पवई, मुंबई-४०००७६ संपर्क : २५७९८४७१
• दत्तात्रय टॉवर, मॅकडोनॉल्डसच्या बाजुला, नाईकवाडीसमोर, गोखलेरोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२ संपर्क : ६७९५५५६२/९८१९७९४७२८

विद्यार्थ्यांनी संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक त्या दाखल्यांच्या साक्षांकित प्रतीसह खालील पत्त्यावर दिनांक ७ एप्रिल २०१२ पूर्वी पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
श्री.प्रवीण त्यागी, व्यवस्थापकीय संचालक, IIT-ian's PACE EDUCATION PVT LTD ४०१,४ था माळा, शॉपर्स पॉईंट, एस.व्ही.रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५८

अधिक माहिती करीता ०२२-६१७७९७७७ वर फोन करावा किंवा info@iitanspace.com येथे ई-मेल करा किंवा www.iitanspace.com या वेबसाईटला भेट द्या.

No comments:

Post a Comment