Thursday, October 26, 2017

भाग-:१३ व १४ लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा....!

भाग-:१३
लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा....!
सोळावी प्रतिज्ञा -: १६) मी खोटे बोलणार नाही.
खोटे बोलणे वाईट गोष्ट आहे....त्यामुळे एखद्याचे जीवनाचे वाटोळे होऊ शकते.खोटे शब्दाला दुसरे नाव आहे अफवा आणि अफवा पसरविल्याने मुंबई येथील परळ रेल्वे स्टेशनची जी घटना घडली त्यामुळे बावीस जणांना आपला जीव गमवावे लागले आहे.बावीस कुटुंबियांवर शोककळा पसरली होती.वैदिक धर्म पंडित आजपर्यंत आपल्याला खोटे बोलत आलेले आहेत.त्यांनी या सृष्टीची निर्मिती विराट पुरुषामुळे झाली आहे....असे सांगून त्याच्या मुखातून ब्राह्मणाने जन्म घेतला असे सांगून तो कसा श्रेष्ठ आहे असे खोटे सांगून त्याचे श्रेष्ठत्व आपल्यावर लादले आहे.वैश्य काकेतून जन्मला असे सांगून क्षत्रियाने झांगेतून जन्म घेतला आहे....आणि क्षत्रियाचा परशुरामाने नायनाट करून त्याला पूर्ण संपविले होते....आणि नंतर पुन्हा परशुरामाने क्षत्रियाला जन्माला घातले असे खोटे बोलून तसा खोटा इतिहास निर्माण केला आहे.ब्रह्मा-विष्णू-महेश-राम-कृष्ण-गौरी-गणपती हे तुमचे देव आहेत असे खोटे बोलून त्यांचा आपल्या जीवनात शिरकाव करून घेतला आहे.छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माचा संरक्षक होता असे खोटे बोलून त्यांना हिंदू राजा घोषित करून घेतले आहे.संभाजीराजे धर्मवीर होते आणि त्यांनी हिंदू धर्मासाठी आपले बलिदान दिले असे खोटे बोलून त्यांना धर्मवीर संभाजीराजे असे आपल्या समोर रुजविले आहे.गौतम बुध्द विष्णूचा अवतार आहे असे खोटे बोलून बौध्द गयावर ताबा मारला आहे.लाल महाल हा लाल महाल असून तो पेशव्यांचा शनिवार वाडा असे खोटे बोलून शिवशाही संपविण्याचा घाट घातला आहे.म्हणून मी खोटे बोलणार नाही.

 भाग-:१४
लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा....!
सतरावी प्रतिज्ञा -: १७) मी दारू पिणार नाही.
दारूडा (मदिरा) याचा अर्थ दारू पिणारा असा आहे.पाली भाषेत दारूला सुरा असे म्हटले जाते....आणि अरबियान भाषेत सूर असे म्हंटले जाते.त्यामुळे दारु पिणाऱ्या व्यक्तीला सूर असे म्हटले जाते.....आणि दारू न पिणारे यांना असुर म्हटले जाते.त्यामुळे रावण आणि बळीराजा हे असुर होते.....आणि शिवलिंग मंदिराचे उपासक होते....म्हणून त्यांना वैदिक धर्म पंडित असुर म्हणायचे....! आणि यांचा बळी वैदिक धर्म पंडितांनी घेतलेला आहे.आता सर्व सामन्यांची दिवाळी हा सन आहे....आणि हा सन साजरी करताना तो सुगंधी उटनाने आंघोळ करतो.तेव्हा त्या घरातील स्त्री त्याला ओवळून दोन वाक्य म्हणत असते.आली वर्षाची दिवाळी...! मोती पवळ्यानी ओवाळी...! इडा पीडा टळो....आणि बळीचे राज्य येवो.याचा अर्थ आजही बळीराजा आपला पूजक आहे....त्यामुळे आपण असुर आहोत...दारू न पिणारे लोक...! म्हणून मी दारू पिणार नाही

भाग-:११ व १२ लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!

भाग-:११
लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
चौदावी प्रतिज्ञा -: १४) मी चोरी करणार नाही.
चोरी हा अतिशय वाईट विषय आहे मग ती घरात गुपचूप चुसून करणे असो......वा दरोडा घालून असो....वा विश्वासघात करून असो......!
उदा-क्र.१ सिंधू (हिंदू) ही भारताची संस्कृती होय....याची आर्यांनी चोरी करून त्यावर हिंदू धर्म लादून मानवी जीवनाचे वाटोळे केले आहे.
उदा – क्र.२ गौतम बौध्द ह्याला विष्णूचा अवतार दाखवून त्याच्या विचारांची चोरी या वैदिक धर्म पंडितांनी केली आहे.
उदा – क्र.३ महेश निर्माण करून शिवलिंग मंदिराची चोरी या वैदिक धर्म पंडितांनी केली आहे.
उदा – क्र.४ नैसर्गिक जन्म न घेतलेल्या काल्पनिक जन्म घेणाऱ्या गणपती काल्पनिक महेशाचा पुत्र दाखवून शिवलिंग मंदिराच्या भक्तांची चोरी वैदिक धर्म पंडितांनी केली आहे.
उदा – क्र.५ संताची हत्या करून वारकरी सांप्रदाय यांची चोरी वैदिक धर्म पंडितांनी केली आहे.
उदा – क्र.६ लाल महालची चोरी करून त्यावर शनिवार वाडा उभा करून स्वराज्याची चोरी या वैदिक धर्म पंडितांनी केली आहे.
चोरी झाल्यामुळे मुलनिवासी यांचे अतोनात न भरून निघणारे नुकसान झाले आहे.बौध्द विहारंची चोरी करून येथील भारत बदल्यांचे काम त्यांनी केले आहे.....आणि ज्या व्यक्तीच्या घरात गुपचूप चोरी होती त्याला विचारा त्याचे काय नुकसान होते ते.....ज्याच्या घरात दरोडा पडला आहे त्याला विचारा काय हालत होते ते....आणि विश्वासघात करून ज्याने चोरी केली अशा बहुजन समाजाला विचारा त्याची काय हालत झाली आहे....आणि आज त्या खऱ्या मावळ्यांच्या वंशजाना आणि दलितांना विचारा त्यांच्या स्वराज्यातील योगदानाची चोरी केली गेली तर आज त्यांचे काय हाल झाले आहेत ते......म्हणून मी चोरी करणार नाही.


 भाग-:१२
लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा....!
पंधरावी प्रतिज्ञा -: १५) मी व्यभिचार करणार नाही.
व्यभिचार समाजाचा आणि कुटुंबाचा खूप मोठा शत्रू आहे.......व्याभिचाराला दुसरे नाव चंगळवाद म्हटल जाते.आपल्या महापुरुषांनी सामाजिक जीवनात कधीच महत्व दिले नाही. व्यभिचार (चंगळवाद) ही संस्कृती आपली म्हणजे हिंदू संस्कृती नाहीये. ही संस्कृती परकीय देशातून आलेली आहे.पूर्वी व्यभिचार (चंगळवाद) आपल्या देशातील लोकांना माहित नव्हता.जेव्हा आर्यांनी आपल्या संस्कृती वर आक्रमण केले तेव्हा त्यानी ब्रह्मा विष्णू महेशाची निर्मिती केली.इंद्रलोक स्थापन करून त्याचा राज दरबार निर्माण करून मेनका-अप्सरा-रंभा अशा नर्तीकी निर्माण करून स्वर्गलोकात असा आनंद प्राप्त होतो.अशा पद्धतीचा व्यभिचार (चंगळवाद) उभा करून येथील राज घराण्यांना नादी लावण्याचे कार्य करून त्यांची सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचे काम त्यांनी केली....आणि असा समज निर्माण केला जो नेतृत्व करतो त्याला हे सर्व भोगण्याचा अधिकार आहे.त्यातून त्यांनी आपल्या राजनीतीतील नऊ नितीपैकी व्यभिचार (चंगळवाद) वापरून इथल्या संस्कृतीवर घाला घातला आहे......गाव प्रशासनातील पाटील यांच्यावर याच व्यभिचार (चंगळवाद) पगडा बसविण्याचे कार्य केले....आणि इतिहासात उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर मी रांजाच्या गुजर पाटलांचे देईन.जेव्हा व्याभिचार प्रकरणी त्याला शिवरायांच्या समक्ष उभा केला तेव्हा तो शिवरायांना हेच म्हणाला की,आम्ही पाटील आहोत आणि कोणतीही स्त्री भोगण्याचा मला अधिकार आहे....आणि त्यात तुला पडायचे कारण नाही.तेव्हा शिवरायांनी त्या गुजर पाटलाचा चौरंगा केलेला आहे.
ज्या लाल महालातून स्वराज्याची बी रोवले गेले त्याच लाल महालावर ताबा मारून त्याचा शनिवार वाडा करून पेशव्यानी व्यभिचार (चंगळवाद) मनसुरादपणे भोगला आहे.श्रीकृष्णाला व्यभिचारी दाखवून भगवतगीतेच्या माध्यमातून तो सामान्य जनतेपर्यंत पोहाचविलेला आहे.मराठी चित्रपटात अभिनेता निळू फुले यांच्या माध्यमातून पाटील कसा व्यभिचारी (चंगळवादी) असतो हे दाखवून मराठ्यांचे स्वराज्यातील योगदान संपविण्याचे कार्य याच मनुवादी षडयंत्राने दाखविलेले आहे.युरोपातील व्यभिचारी (चंगळवादी) पाश्चात्य संस्कृती भारतात आणून येथील तरुणांना त्याच्या नादी लावण्यासाठी पब क्लब,डान्स बार,वैश्या व्यवसाय आणि हिंदी मराठी चित्रपटात स्त्रीला नग्न दाखवून इथला तरुण भ्रमित करण्याचे कार्य यांनीच केले आहे.गणेश उत्सवाच्या माध्यमातून व्यभिचारी (चंगळवादी) जोपासण्याचे कार्य यांनीच केले आहे.त्यामुळे येथील तरुणाचे तर वाटोळे झालेच आहे.परंतु देशाचे आणि समाजाचे पर्यायाने स्वत:च्या कुटुंबाचे वाटोळे झालेले आहे.त्यामुळे मी व्यभिचार करणार नाही.

भाग – ८ व ९ आणि १० लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.....!

भाग – ८
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.....!
सातवी प्रतिज्ञा -: ७) मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
गौतम बुद्ध हे अखेरचे सत्य आहे त्यापलीकडे कोणतेही सत्य नाही....त्यांनी दिलेला धम्म (विचार) ही खरी मानवता आहे....आणि या मानवतेने जगाच्या मानव विश्वाचे कल्याण केलेले आहे.त्यांनी शांततेचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे.स्वयंम प्रकाशित होण्याचा मार्ग त्यांनी आपल्याला दिलेला आहे.सत्य हे आपले जीवन आहे बाकी सर्व थोतांड आहे.....जो समता बंधुता न्यायाने वागतो.... तो म्हणजे बौध्द होय....! आणि शहाजीराजे – माता जिजाऊ – छत्रपती शिवराय – संभाजीराजे हे या विचारांनी वागले आहेत....म्हणून ते खरे बौध्द (विचाराने) आहेत.त्यांच्यावर हिंदू धर्माचा पगडा बसविणे म्हणजे बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कृत्य करणे होय...! मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.(क्रमश:)

भाग – ९
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.....!
आठवी प्रतिज्ञा -: ८) मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
आर्य म्हणून भारतावर अतिक्रमण केले....वैदिक धर्म म्हणून स्वत:ला श्रेष्ठ ठरविण्यासाठी देवगीरचा रामदेवराव जाधव या महार राजाला श्रेष्ठ ठरवून त्याच्या हातून त्याच्या भावडांना अस्पृश्य ठरविण्याचे कार्य केली. वैदिक धर्म श्रेष्ठ कसा....आणि या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लाखो बौध्द भिक्षुकांची कत्तल घडवून आणली.ज्यांनी मानव कल्याणकारी वारकरी सांप्रदाय स्थापन केला अशा संताची हत्या केली.ज्यांनी स्वराज्यासाठी वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून वारकरी सेना स्थापन केली अशा संत तुकाराम महाराजांची हत्या करून त्यांना विष्णूरुपी वैकुंठात पाठविले.छत्रपती शिवरायांना यांनी शुद्र ठरविले....या वैदिक बामनाना नाकरून .छत्रपती शिवरायांनी शाक्त धर्म पद्धतीत दुसरा राज्याभिषेक करवून घेतला अशा शिवरायांची हत्या विश्वासघाताने या बामनानी घडवून त्यांचे अंत्यदर्शन रयतेला होऊ दिले नाही.मनुवादी पद्धतीत छत्रपती संभाजीराजे यांची क्रूर हत्या घडवून गुडीपाडव्याच्या माध्यमातून साखर वाटून नव वर्षाची सुरुवात केली.शिवशाही संपवून पेशवाई निर्माण करून जातीय व्यावस्था मजबूत करून दलितांवर अस्पृश्य म्हणून अन्याय केला.विष्णुरूपी सत्यनारायण महापूजा लादून स्त्री विटंबनाची आठवण ताजी ठेवली.हिंदू संस्कृती वर हल्ला करून आमच्यावर ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती आमच्यावर लादून गौतम बुद्धाना विष्णूचा अवतार दाखवून खोटा व खोडसाळ प्रचार सुरु ठेवला.म्हणून मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही


भाग – १०
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.....!
नववी प्रतिज्ञा -: ९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
पृथ्वीची निर्मिती नैसर्गिक शक्तीने केलेली आहे.....मनुष्य या पृथ्वीवरील बुद्धीजीवी प्राणी आहे....त्याच्या मध्ये संवेदना (भावना) आहेत.एकमेकांचे तो सुखदुख जाणतो......आणि तो एक सामाजिक मनुष्यप्राणी आहे.कौटुंबिक व्यावस्थेची त्याला जाणीव आहे.....आणि तशी जाणीव आपल्याला आपल्या महापुरुषांनी समाजहिताचे आणि मानवकल्याणाचे कार्य करीत असताना करून दिलेली आहे.त्यांनी कधीही कुटुंब सोडून कार्य करा कधी असे म्हटलेले नाही.(उदा – शहाजीराजे-माता जिजाऊ- संभाजीराजे,जयसिंगराजे,छत्रपती शिवराय आणि संत तुकाराम महाराज आणि त्यांचे कुटुंब तसेच महात्मा ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले-डॉ यशवंत फुले तसेच डॉ बाबसाहेब आंबेडकर – माता रमाई आंबेडकर आणि त्यांचे कुटुंब) ज्यांनी मनुष्यमात्र समान उच्च निच्च असा भेदभाव नाही असे आपल्याला सांगितले आहे.आणि त्यासाठीच या सर्व महापुरुषांनी मनुष्यमात्र समान आहेत अशी शिकवण आपल्याला दिलेली आहे.म्हणून मी सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो. 

भाग-:५ व ६ आणि ७ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्

भाग-:५
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
चौथी प्रतिज्ञा -: ४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
देव ही संकल्पना अस्तित्वात नाही....अस्तित्वात आहे ती सामाजिक एकता....! विषय असा आहे की,या समाजात विविध घटक आहेत...आणि हे घटक आपल्या पारंपारिक प्रशासन व्यावस्थेतून तयार झालेले आहेत...कारण आपल्या गावची प्रशासन व्यवस्था ही अठरा पगड आणि बारा बलुते अशी होती....मातृकसत्ताक पद्धतील जीवन आपले होते......अवतार असा विषय कधीच आपला नव्हता.जन्म आणि मृत्यू हा निसर्ग नियमन आहे....आणि तो एकदाचा होतो...आणि हेच सत्य आहे.त्यामुळे पाप पुण्य हा फेरा आपला नाही.माझ्या जीवनात एकदाच बालपण येत....आणि माझ्या जीवनात एकदाच तरुण वय येते....आणि ते जीवन माझे कसे सार्थक होईल एवढाच माझा विषय असतो.त्यामुळे मी जे माझ्या जीवनात करेल ते खरे....! त्यामुळे देव अवतार घेईन आणि माझे जीवन तो सार्थक करेल याला काहीही अर्थ नाही...त्यामुळे मला स्वयंम प्रकशित व्हायचे आहे.म्हणून देवाने अवतार घेतले आहे यावर मी विश्वास ठेवणार नाही

भाग-:६
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
पाचवी प्रतिज्ञा -: ५) गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो..
गौतम बुद्ध हे अखेरचे सत्य आहे त्यापलीकडे कोणतेही सत्य नाही....त्यांनी दिलेला धम्म (विचार) ही खरी मानवता आहे....आणि या मानवतेने जगाच्या मानव विश्वाचे कल्याण केलेले आहे.विष्णू हे असत्य आहे त्याचे अवतार जे सनातनी धर्माने दाखविले आहे त्यांमध्ये क्रूरता दाखविली आहे....अज्ञानाला मान्यता दिलेली आहे.त्या अज्ञानाने तुमचे आमचे वाटोळे केले आहे.वेदिक धर्माचे आक्रमण हे ऐतिहासिक सत्य आहे ते नाकारण्यासाठी लाखोंनी आपल्या स्वत:चे बलिदान दिलेले आहे...त्यांचे बलिदान विसरता येऊ शकत नाही...त्यामुळे विष्णू हा मानव धर्माच्या रक्ताने माखलेला विषय आहे...त्याला स्विकारणे म्हणजे मानवसंवार (मानव धर्माचा अंत) स्वीकारणे होय.त्यामुळे गौतम बुद्ध सत्य आहे...आणि हे सत्य लपविण्यासाठी त्यांना विष्णूचा अवतार माना असे सनातन धर्म जाचकतेने आपल्यावर लादीत आहे.याला तसे कारणही आहे आणि हे सत्य आहे.बिहार येथे बुद्ध धर्माचे श्रद्धास्थान म्हणजे बौध्द गया म्हणून सर्वत्र प्रसिध्द आहे.या बौध्द विहारवर जी संस्था आहे त्या संस्थेचे रा.सु.गवई ४० वर्ष अध्यक्ष होते.या विहारात गौतम बुद्ध पर्यंत कोणत्याही व्यक्तीला तर सोडा बौध्द भिक्षुकांनाही जाण्याची परवानगी नाही....कारण यावर सनातनी धर्माचे आक्रमण आणि ताबा आहे.जानवे घातलेला धोतर पंडिताचा यावर ताबा आहे...रोज निती नियमाने हा विष्णू अवतार गौतम बुध्द याची आरती म्हणतो......आणि तेथे उपस्थित सर्व बौध्द अनुयायी आणि भिक्षुक यांना टाळ्या वाजवायला लावतो....आणि असा खोटा आणि खोडसळ प्रचार ते करीत आहे.म्हणून मी गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे असे मी मानीत नाही.


भाग – ७
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.....!
सहावी प्रतिज्ञा -: ६) मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
पिंडीचा अर्थ जर समजून घेतला तरच हे सर्व आपल्या लक्षात येईल....पिंड म्हणजे देह आणि या देहावर निसर्गा नंतर माझ्या स्वत:चा अधिकार आहे.....आणि नेमके हे पिंड आपण कोणाला दान करतो हे महत्वाचे आहे.श्राध्दपक्ष हा बामणांचा काळ आहे.....तो वैदिक धर्मीय आहे......ते आपल्यावरील आक्रमण आहे.....त्याचा आणि आपला काही एक संबध नाही.याकाळात त्याला आपण आपले पिंड (देह दान) करणे म्हणजे आपण आपले पूर्वज त्यांना दान करणे होय....आणि या माध्यमातून पाप पुण्य हा फेरा आपल्या बरोबर चालू ठेवणे होय.कर्मकांड आणि पाप पुण्य हे आपले कर्म नाही एवढे जरी आपण लक्षात तरी सत्यता आपल्या लक्षात येईल.मी माझ्या पूर्वजांचे पिंडदान (देहदान) करणार नाही. 

भाग - ४ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!

भाग - ४
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
गणपती - : आज आंम्ही शिक्षण घेतलेले लोक आहोत....सत्य असत्य आम्हाला समजते.चंद्र सूर्य तारे थोडक्यात आकाशगंगा आम्हाला माहित आहे...आम्हाला याचीही जाणीव आहे की,निसर्ग नियमानुसार जो पर्यंत नर आणि मादी एकत्र येत नाही.तो पर्यंत जन्म नावाची प्रक्रिया घडत नाही.त्यामुळे स्त्री आणि पुरुष यांचे नैसर्गिक मिलन होत नाही तो पर्यंत माणसाचा जन्म होत नाही.तुमचे आणि माझे सत्य असे आहे की,आपल्या आई - बाबांनी नैसर्गिक मिलन केले म्हणून आपला जन्म सत्य आहे.त्यामुळे गणपतीचा जन्म थोतांड आहे.प्रश्न असा आहे की,ज्या शंकराला गणपतीचा बाप दाखविलेला आहे....त्याच्या गळ्यात साप दाखविलेला आहे...आणि पाणी त्याच्या डोक्यातून येते असे दाखवून त्याच्या कमरेला वाघाची लंगोट दाखविलेली आहे....आणि त्याच्या अंगामध्ये जानवे दाखविलेले नाही.सरळ सरळ तो जंगलात राहणारा आदिमाणुस दाखविलेला आहे....आणि गणपतीचा जन्म शरीराच्या घामातून निघालेल्या मळापासून निसर्ग नियमांच्या विरुध्द दाखविलेला आहे....त्यामुळे तो नैसर्गिक जन्म दाखविलेला नाही....तो एक काल्पनिक जन्म आहे....त्यामुळे माझ्यासारखा सुज्ञ आणि शिकलेला व्यक्ती याला सत्य म्हणून मान्यता देऊ शकत नाही.माझी बुद्धी कोणाकडे मी गहाण ठेवलेली नाही.माझ्या मानसिकतेवर कोणाचा ताबा नाही...कोण मला म्हणेल गणपतीचे कापलेल्या शिराच्या जागी हत्तीचे शीर वसवून पहिली सर्जरी भारतात केली आहे...असे म्हणून त्याची जाहिरात करून आमच्या मानसिकतेवर ताबा मारेल...तर असे मी होऊ देणार नाही.मला हे माहित आहे...जन्म झाला की,मृत्यू होतो...आणि मृत्यू झालेला प्राणी पुन्हा जिवंत होत नाही.मी भारताचा नागरिक आहे एवढा वेडा नाही की,कोणी मला काहीही सांगेल....आणि ते मी मान्य करेन..! श्रद्धा कोठे ठेवायची आणि कोणावर ठेवायची याची मला जाण आहे...म्हणून मी गणपती मानणार नाही....आणि त्याची उपासना करणार नाही.
४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.

भाग - ३ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!

भाग - ३
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
आपण पहिल्या भाग १ व २ मध्ये ब्रम्हा विष्णू महेश राम समजून घेतला आणि त्याला का मानणार नाही आणि त्याची उपासना करणार नाही हे समजून घेतल आहे.आता कृष्ण गौरी आणि गणपती का मानायचे नाही हे समजाऊन घ्यायचे आहे.
कृष्ण -:वासुदेव पुत्र म्हणजे कृष्ण आणि राजा कंस याचा भाचा आणि या भाच्याने आपल्या मामाचा अंत केला असे दाखविलेले आहे.....आणि कृष्णाचा भाऊ म्हणजे हातात नांगर घेऊन दाखविलेला बलराम....!विषय असा आहे की,वासुदेव हा ब्राह्मण आहे.आणि कंस हा इथला राजा आहे.आता याठिकाणी एक प्रश्न असा उपस्थित होतो की,कंस राजाची हत्या वासुदेवाचा आठवा पुत्र म्हणजे कृष्णाच्या हातून होणार होती अशी आकाशवाणी दाखविण्यात आलेली होती...आणि कंस याने आपली बहिण देवकी आणि तिचा नवरा वासुदेव या दोघांना एकाच ठिकाणी एकत्र तुरुंगात ठेवले आणि तिला आठवा पुत्र होण्याची वाट बघत होता....आणि प्रत्येक मुलाची तो हत्या करीत होता.एवढा जर तो क्रूर होता तर त्याने सर्वप्रथम या दोघांपैकी एकाची हत्या का केली नाही किंवा यांना पुत्र होऊ नये म्हणून वेगवेगळे का डांबले असा माझा प्रश्न आहे.तो दोघांना एकत्र ठेऊन आठव्या मुलाची वाट बघत प्रत्येक मुलाची हत्या का करीत होता याचा अर्थ सरळ सरळ हे थोटांत आहे असे काही घडलेले नाही.या कृष्णाचे जीवन टवाळक्या करणार पोर आणि आणि आंघोळ करीत असलेल्या महिलांची छेडछाड करणार व्याभिचारी पोर असे त्याचे चित्र दाखविलेली आहे.आणि स्त्रीचे ज्याने पाहिलं अपहरण केले तो म्हणजे कृष्ण होय.ज्याने महाभारत घडविले म्हणजे आपल्या आप्तांची पाच पांडवांना ज्याने हत्या करायला लावली.या महाभारतात असे दाखविलेले आहे की.एका स्त्रीचा पाच जणांनी पती म्हणून भोग घ्यायचा...त्या स्त्रीला संपूर्ण राज दरबारात वस्त्रहीन दाखविलेले आहे.म्हणजे आपल्या आप्तांची हत्या आणि स्त्रीची विटंबना या कृष्ण रुपी महाभारतात दाखविलेली आहे.म्हणजे अशा कृष्णाला समाजात मान्यता देणं आणि त्याच्या कृत्याला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता देणं हे गैर आहे.म्हणून अशा कृष्णाला मी मानणार नाही...आणि त्याची उपासना करणार नाही.
तिसरी प्रतिज्ञा -: ३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
गौरी - : विषय असा आहे की,ज्या ठिकाणी आपण महेश अमान्य केला आणि त्याचे अस्तित्व आपण मान्य करीत नाही.तर त्याचे पुत्र गौरी गणपती मान्य करता येत नाही ही एक काल्पनिक कथा आहे...आणि गणपतीचा जन्म कल्पनेपलीकडला असून त्याला मान्यता....(क्रमश:)

भाग - २ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!

भाग - २
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
सदरच्या प्रतिज्ञाची आठवण ही प्रत्येकाला होणे गरजेचे आहे असे मला वाटत आहे.कारण असे आहे की,जर खरेच आपल्याला शनिवार वाड्याचे नामांतर लाल महाल करायचे असेल तर या बावीस प्रतिज्ञाची आठवण झालीच पाहिजे.
महेश - :याचा अर्थ जर समजाऊन घेतला तर आपल्याला असे लक्षात येईल की,शंकर याचा अर्थ काय...?...आणि हा शंकर कोण आहे...आणि याचा शोध घेतला तर कोठेही याचे अस्तित्व सापडत नाही...मात्र एक काल्पनिक कथा तयार केली गेलीली आहे..आणि ती म्हणजे शंकर हा विनाशाचे रूप दाखविण्यात आले आहे.......आणि त्याचे मंदिर म्हणजे शिवलिंग मंदिर होय.महाशिवरात्री दिवशी त्याचा जन्म झालेला आहे...आणि त्या दिवशी भांग नावाचा प्रसाद ग्रहण करायचा आणि थोतांड मान्यता समाजात करून दिलेली आहे.ही मान्यता चुकीची आहे कारण भांग हा गांजा पासून बनविलेला पदार्थ आहे.या पदार्थाला कोठेही सामाजिक व कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही.शिवलिंग मंदिर आणि शंकर यांचा कोणताही संबध येत नाही.शिवलिंग मंदिर बदनाम करण्याचे हे एक बामणी षडयंत्र होते व आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
शिवलिंग - : पिंड म्हणजे देह आणि शिव म्हणजे सत्य आणि शिवलिंग म्हणजे आपले स्वत:चे सत्य (अस्तित्व)आहे.आणि हे कोण्या व्यक्तीचे प्रतिक नसल्यामुळे शंकराचा आणि शिवलिंगाचा संबध कधीही जोडता येऊ शकत नाही.ऐतिहासिक शिवमंदिरात कधीही शंकराची मूर्ती आपल्याला बघयला मिळणार नाही.परंतु शिवलिंगाच्या पाठीमागे तुम्हाला नव्याने शंकराचा फोटो लावलेला बघायला मिळेल.(छत्रपती शिवाजी महाराज शंकराचे उपासक असल्याचे कोठेही ऐतिहासिक पुरावे सापडत नाही.ते शिवलिंग मंदिराचे उपासक होते शंकराचे नाही.) त्यामुळे शंकर म्हणजेच महेश मी मानणार नाही त्याची उपासना करणार नाही.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञाच्या माध्यमातून सावध केले आहे.
दुसरी प्रतिज्ञा -: २) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
राम -: याचा अर्थ जर समजावून घेतला तर...असे आपल्या लक्षात येईल की,"रामायण कथा" ही कथा काल्पनिक तयार केली गेलीली आहे.या रामायणामध्ये जे पात्र दाखविलेली आहेत ती काल्पनिक पात्र आहे.पूर्वीच्या काळी श्रीलंका हा एक भारताचा भाग होता...आणि तो भारतापासून १९१४ ला वेगळा झाला आहे.(लोकमान्य टिळकांनी पहिली हिंदु महासभा १८९३ मध्ये घेतलेली आहे.) भारताचे लोक शिवलिंग मंदिराचे उपासक होते...आणि रावण हा एक राजा होता....आणि तो शिवलिंग मंदिराचा उपासक होता...आणि तो एक असुर होता....आणि असुराचा खरा अर्थ जर आपण समजावून घेतला तर आपल्याला रावणाचा अर्थ समजून येईल...सूर म्हणजे दारू आणि असुर म्हणजे दारू न पिणारा व्यक्ती होय.याची उपासना मोडीत काढण्यासाठी "रामायण कथा " तयार करून त्यामध्ये "सीता" नावाचे पात्र दाखवून तिचा जन्म धरती मधून दाखविलेला आहे.तिच्या माध्यमातून म्हणजे तिची अग्नी परीक्षा घेऊन स्त्री ची विटंबना दाखविलेली आहे.अग्नी परीक्षा घेऊन तिला वनवास दिलेला आहे...आणि वनवासात तिला दोन पुत्र जन्माला घातले आहेत...आणि त्यानंतर तिचा अंत पुन्हा धरती मध्ये दाखविलेला आहे.त्यामध्ये जेवढ्या घटना दाखविलेल्या आहेत त्या येथील मूलनिवासी यांना बदनाम करण्याचे एक षडयंत्र बामनी काव्याने केलेले आहे.त्यामुळे राम मी मानणार नाही...आणि त्याची उपासना करणार नाही.

भाग - १ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!



भाग - १
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
शनिवार वाड्यातील शनीच्या रुपी असणारा पेशवाईचा पाडाव हा सिद्धनाक महार आणि त्याच्या ठोकाळ गड्यांनी केला आहे.आणि हा शौर्याचा इतिहास आजही भीमा कोरेगाव याठिकाणी वीर स्तंभाच्या माध्यमातून आपणा सर्वांना साक्ष देते याचा इतिहास मी पुढील भागात आपल्या सर्व मित्रासाठी देईन.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच वीर स्तंभाला पहिली भेट दिली आणि पहिले सामजिक आंदोलन केले ते महाड येथील चवदार तळ्याचे या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा प्रथम घोषणा देण्याचे कार्य याठिकाणी झाले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
पेशवाईचा पहिला पाडाव हा १८१८ मध्ये झालेला आणि त्याचा दुसरा पाडाव हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि तिसरा पाडाव हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान देऊन केले आहे.आणि ४ था व शेवटचा पाडाव हा मी भारत बौद्धमय करीन अशी शपथ घेऊन आणि तमाम लोकांना बौध्द धम्माची शिकवण १९५६ साली देऊन केली आहे.यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला बावीस प्रतिज्ञा देऊन केली आहे.
सध्याचे वातावरण बघितले....आणि ते वातावरण पाहिले म्हणून मला आज त्या बावीस प्रतिज्ञाची आठवण झाली आहे.म्हणून असे वाटले याठिकाणी त्या वातावरणावर थोडेसे आपले मत व्यक्त करावे....या मतातून कोणाला दु:ख पोहचत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही.

पहिली प्रतिज्ञा -: १) मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
ब्रह्मा -:याचा अर्थ जर समजाऊन घेतला तर आपल्याला असे लक्षात येईल की,ब्रह्माचा अर्थ काय...?...आणि हा ब्रह्मा कोण आहे...आणि याचा शोध घेतला तर कोठेही याचे अस्तित्व सापडत नाही...मात्र एक काल्पनिक कथा तयार केली गेलीली आहे..आणि ती म्हणजे ब्रह्मा म्हणजे विराट पुरुष आणि या विराट पुरुषाच्या मुखातून ज्याने जन्म घेतला आहे तो म्हणजे बामन (श्रेष्ठ) आणि ज्याने काकेतून जन्म घेतला आहे तो म्हणजे वैष्णव आणि ज्याने त्याच्या झांगेतून जन्म घेतला आहे तो म्हणजे क्षत्रिय म्हणजे (योद्धा,लढवय्या,आणि यांचा पूर्ण नायनाट हा परशुरामाने केला होता असे म्हटले जाते..आणि नंतर यानेच क्षत्रिय जन्माला घातले असेही म्हटले जाते.) आणि चौथा म्हणजे ज्याने याच्या तळपायातून जन्म घेतला तो म्हणजे शुद्र (खालच्या स्तरातील छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक याच कारणाने बामनानी नाकारला होता...आणि त्यांना दुसरा राज्यभिषेक शाक्त धर्मानुसार करावा लागला) अशा विराट पुरुषाला म्हणजे ब्रह्माला मी मानणार नाही.
विष्णू -: याचा अर्थ जर समजाऊन घेतला तर आपल्याला असे लक्षात येईल की,विष्णू अर्थ काय...?..आणि याचा शोध घेतला तर कोठेही याचे अस्तित्व सापडत नाही...मात्र एक काल्पनिक कथा तयार केली गेलीली आहे.....आणि ती म्हणजे विष्णू म्हणजे तुमचा आमचा पालनकर्ता होय.हा पाताळात नेहमी निद्रावस्थेत दाखवलेला आहे....त्याचे पाय त्याची पत्नी दाबत असताना दाखविलेले आहे......आणि यानेच संत तुकाराम महाराजांना विमान पाठवून आपल्या वैकुंठात बोलाविलेले आहे.(याठिकाणी संत तुकाराम महाराजांची हत्या केली असून विष्णूच्या नावाखाली लपविलेली गेलेली आहे.) म्हणून मी याला मानणार नाही