Monday, January 29, 2018

माता जिजाऊ स्वराज्याच्या रयतेला माफ करा....! छत्रपती शिवराय स्वराज्याच्या रयतेला माफ करा....! यात रयतेची चूक नाही......!




२६ जानेवारी हा दिवस स्वराज्यातील रयतेच्या आनंदाचा दिवस आहे....कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताला भगवान गौतम बुध्द यांच्या विचारांचा,सम्राट अशोक यांच्या साम्राज्याचा आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी विचारांचे स्वराज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेतून तयार केलेले संविधान दिले.बावीस प्रतिज्ञाच्या माध्यमातून वैदिक धर्म पंडितांनी स्वराज्याच्या रयतेवर लादलेले ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती नाकरून मानसिक गुलामीतून रयतेला मुक्त करून सिंधू संस्कृतीचे दर्शन दिले आहे.मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोठेही कुलदैवत नाकारल्याचे दिसत नाहीये.असे असताना आपण आपले कुलदैवत नाकरून वैदिक धर्म पंडितांनी निर्माण केलेलं त्यांचे आराध्य दैवत मोदक खाणाऱ्या गणपतीचे आजचा तरूण मोठ्या प्रमाणात भक्त होताना दिसत आहे.सामजिक क्षेत्रात काम करणारी संभाजी ब्रिगेड जेव्हा राजकीय पक्ष झाला तेव्हा त्यांनी त्यांची भूमिका बदल केल्याचे नुकतेच गेल्या वर्षीच्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून समोर आलेले आहे.बाळकृष्ण गंगाधर टिळकांनी १८९५ मध्ये पहिला सार्वजनिक गणपती बसविलेला होता आणि तो तेहतीस कोटी हिंदू देवतांचा आराध्य दैवत म्हणून समोर आणला होता.मात्र सामाजिक संघटना असलेल्या संभाजी ब्रिगेड यांनी वैदक धर्म पंडितांचा मोदक खाणारा गणपती हा भाऊ रंगारी (लक्ष्मण जावळे) यांनी टिळकांच्या आधी म्हणजे १८९४ मध्ये पहिला सार्वजनिक गणपती बसविलेला होता असा प्रचार करून आर्य सनातनी हिंदू धर्माचा प्रचार करून स्वराज्याच्या रयतेला सुखकर्ता आणि दुखकर्ता म्हणायला लावून स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांचा अपमान करणारे स्वराज्य बुडविणारे वैदिक धर्म पंडितांचे समर्थन करायला लावून स्वराज्याच्या रयतेला दोषात ठेवले आहे.म्हणून मी म्हणतो स्वराज्याच्या रयतेची यात काही चूक नाही.माता जिजाऊ स्वराज्याच्या रयतेला माफ करा....!
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांचे मार्गदर्शन घेऊन मावळातील दीडशे मावळे बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्व्राज्यचे संकल्पक झाले आहेत.त्यानी त्यांच्या कर्तबगारीतून स्वराज्य निर्माण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात कधीही ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांना स्थान दिलेले नाही.असे असताना कोल्हापूर गादीचे वंशज भाजप समर्थक खासदार संभाजीराजे भोसले यांनी २६ जानेवारी २०१८ च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्याभिषेक रथ काढण्यात आला होता.या रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात मध्ये विष्णूची मूर्ती देऊन शिवराय कसे वैदिक धर्म पंडितांचे मानसिक गुलाम होते याचे प्रत्यक्ष खोटे दर्शन जगासमोर आणले आहे.याला कोणताही विरोध खासदार संभाजीराजे भोसले यांनी केला नाही आणि हा अपमान सर्वानी आनंदात स्वीकारला आहे. म्हणून छत्रपती शिवराय स्वराज्याच्या रयतेला माफ करा....! यात रयतेची चूक नाही......!

Sunday, January 14, 2018

वढू बुद्रुक ते भीमा कोरेगाव “विजयस्तंभ” २०१८ समतापर्व





भीमा कोरेगाव येथील १ जानेवारी १८१८ च्या युध्दास २०१८ मध्ये २०० वर्ष पूर्ण झाले आहे.या युध्दाचे प्रतिक म्हणून यावर्षी अलुतेदार यांचा वर्ग मोठ्या प्रमाणात “विजयस्तंभ” याठिकाणी शूर वीरांना मानवंदना देण्यास येणार होता.या लढाईचे नेर्तुत्व विचित्र गड भोर प्रांताचा सातारा गादीचा मराठी सरदार सिद्धनाक महार याच्याकडे होते.हा सिद्धनाक महार याचे गाव कोणते तर हा भोर प्रांतातील “नागेवाडी” गावचा रहिवासी असून त्याचे खरे नाव “सेदुबीन नागनाथ महार” असे आहे.सातारा गादीच्या आदेशावरून त्याने विचित्रगड घेण्यासाठी आपण महार योध्दा असल्याचे कौशल्य दाखवून १८१७ मध्ये विचित्रगड ताब्यात घेतला होता.कोल्हापूर गादीचा सांगली येथील “कळंब” या गावचा सिद्धनाक महार याने १७९५ मध्ये झालेल्या खर्ड्याच्या लढाईत आपले कर्तुत्व दाखवून “पटवर्धन” याचा जीव वाचविला होता आणि हरलेले मराठ्यांचे युध्द सिद्धनाक महार याने जिंकले होते.त्यामुळे विचित्रगड भोरचा मराठी सरदार “सेदुबीन नागनाथ महार” याला सातरा गादीने १८१७ मध्ये “सिद्धनाक महार” ही उपाधी दिली होती.त्यामुळे १८१८ मध्ये दोन सिद्धनाक महार दिसून येतात.तुळापुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करून वढू गावात फेकून दिले होते....ते तुकडे गोळा करून ते शिवून त्यांचा अंत्यसंस्कार वढू येथील समस्त महार यांनी करून त्यांची समाधी उभारलेली आहे.या समस्त महार यांचा प्रमुख गोविंद महार याचा मृत्यू झालेनंतर समस्त महार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी जवळ गोविंद महार यांची समाधी उभारली आहे....आजही त्यांच्या समाधीला दिवाबत्ती केली जात आहे.समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर बनविण्यासाठी त्याठिकाणी हिंदू संघटनांनी सरमजांशाही पध्दतीचा अमल सुरु केला आहे.२०० वर्षापूर्ती निमित्त भीमा कोरेगाव येथील झालेल्या युध्दाचा खरा इतिहास बाहेर आल्याने सरमजांशाहीचा उद्रेक त्याठिकाणी पाहिला मिळाला आहे.खरा इतिहास हे सांगतो की,विचित्रगड जिंकल्यानंतर दोनच महिन्यात सिद्धनाक महार ही उपाधी प्राप्त असलेल्या “सेदुबीन नागनाथ महार” याला सातारा गादीचे असे आदेश झाले होते की,ज्याठिकाणी लाल महाल होता त्याठिकाणी स्वराज्याचा नोकर असलेल्या पेशव्याने शनिवार वाडा तयार करून त्याठिकाणी लाल महालाची पवित्रता भंग केली आहे.पानिपतचे युध्द घडवून पेशव्याने स्वराज्याची ताकद असणारा एक लाख मराठ्यांच्या घरात बांगड्या फोडण्याचे कटकारस्थान केले आहे.दुसऱ्या बाजीरावाने स्वराज्याची टांकसाळ (चलन) बंद करून स्वत:ची टांकसाळ (चलन) सुरु केले आहे.समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे याच वैदिक धर्म पंडितांनी करून स्वराज्य बुडविले असल्याचे १८०२  मध्ये ब्रिटीश सरकार यांच्यामध्ये दुसऱ्या बाजीरावाने वसईच्या केलेल्या तहा वरून समोर आलेले होते. “आता हत्येचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे आता ही पेशवाई संपवून टाक” असे सातारा गादीचे आदेश सिद्धनाक महार याला प्राप्त झाले होते.त्याने स्वराज्याचे २५० प्रमुख मराठी सरदार यांना वढू येथील संभाजीराजांच्या समाधीस्थळी प्रत्येकी १०० ठोकळगडी घेऊन येण्या संदर्भात लखोटा बजाविला होता.३१ डिसेंबर १८१७ मध्ये सर्वजण संभाजीराजांच्या समाधीस्थळी जमा झाले होते.आता सिद्धनाक महार याच्या नेतृत्वाखाली २५००० ची सेना लढण्यास तयार झाली होती.पेशव्याच्या सेनेला याबाबतची खबर लागली होती की,सिद्ध्नाक महार पेशवाई संपवायला वढू येथे येणार आहे.तेव्हा तो आपली २८००० ची सेना घेऊन नाशिक वरून चाकण मार्गे फुलगाव येथे आला होता.वढू ते भीमा कोरेगाव मधील ७ कि.मी.चे अंतर कापीत सिद्धनाक महार भीमा कोरेगाव याठिकाणी येऊन पोहचला होता. ब्रिटीशांची ८३४ ची सेना शिरूर याठिकाणी तळ ठोकून बसली होती त्यांना पेशव्याची खबर लागली होती त्यामुळे ब्रिटिशांची ८३४ ची सेनाही त्याठिकाणी येऊन पोहचली होती.ब्रिटीश सेनेतील ५०० ढाल तलवार धारण असणारे महार सैनिक पेशव्याच्या विरुध्द लढण्यासाठी सिद्धनाक महार याच्या नेतृत्वात सामील झाले होते.पेशवाई विरुध्द स्वराज्य असे युध्द सुरु झाले पेशव्याचे सेनेचे नेतृत्व बापू गोखले करीत होता.त्याच्या बरोबर त्याचा मुलगा गोपाळ गोखले आणि गोविंद गोखले होते.भीमा कोरेगावच्या लढाईत बापू गोखले यांचा पहिला मुलगा गोविंद गोखले मारला गेला.यामुळे दुसरा बाजीराव पेशवा घाबरला त्याने लगेच बापू गोखले याला युध्द सोडून पळून जाण्याचे सांगितले होते....तो आणि बापू गोखले आणि त्यांची सेना पळून गेली.दुसरा बाजीराव पेशवा स्वराज्यात असता तर तो सातारा गादीकडे पळाला असता पण वसईच्या झालेल्या तहा मुळे स्वराज्य आणि पेशवाई वेगळी झाली होती.त्यामुळे तो दौंड मार्गे पुढे पळत निघाला त्यामुळे महार भीमा कोरेगावचे युध्द जिंकले होते...त्यानी भीमा कोरेगाव येथे झालेल्या स्वराज्याच्या इतिहासातील युध्दाची नोंद इंग्रज सरकारने स्वत:च्या नावे करून घेतले आहे.त्यांनी २८००० विरुध्द ८३४ असे युध्द त्यांच्या इतिहासात नोंद केले आहे.त्यांनी असे का केले असा प्रश्न आपण इतिहासाला विचारायला हवा.परंतु इथले युध्द जरी आपण जिंकले असले तरी संभाजीराजांच्या हत्येचा बदला संपलेला नव्हता कारण पेशवा जिवंत होता.त्याला मारल्याशिवाय पेशवाईचा अंत होणार नव्हता त्यामुळे पळालेल्या पेशव्याचा पाठलाग सुरूच होता.आष्टी येथे सोलापूर जवळ पुन्हा एकदा पेशवे आणि सिद्धनाक महार यांच्या सेने बरोबर युध्द झाले.येथे बापू गोखलेचा दुसरा मुलगा गोपाळ गोखले आणि स्वत: बापू गोखले मारला गेला पुन्हा एकदा सिद्धनाक महार यांच्या विजयाची नोंद इतिहासात झाली.येथूनही दुसरा बाजीराव पेशवा पळून जाण्यास यशस्वी झाला त्यानंतर तो कोठे गेला हे इतिहासात गूढ कायम आहे.परंतु पेशव्याचा पाहुणा बाळाजी नातू याने तोपर्यंत शनिवार वाडा जाळून त्यावर ब्रिटीश युनियन जॅक चढवून तो शरणागत झाला.ब्रिटिशा कडून त्याला ६९ लाख रुपयाची पेन्शन सुरू झाली आजही त्यांचे वंशज ती पेन्शन खात आहे.या महार योद्ध्यांच्या शौर्याचा विजयस्तंभ ब्रिटिशानी भीमा कोरेगाव याठिकाणी उभारला आहे.अशा पेशवाई अंताचे प्रतिक असणारे ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवरायांनी २४ सप्टेंबर १६७४ मध्ये केलेला दुसरा राज्याभिषेक आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७४ मध्ये स्थापना केलेला सत्यशोधक समाज यांची तारीख लक्षात घेऊन २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन करून १९२७ मध्ये या भीमा कोरेगाव याठिकाणी असलेल्या शूर महार योद्ध्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या विजयस्तंभास अभिवादन करून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रही यांच्या हातात भगवा ध्वज देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या घोषणा देण्यास सांगतात.ब्रिटीश सरकारला महाड येथील चवदार तळया संदर्भात ज्या लेटरहेडवर जे निवेदन दिले होते त्या लेटरहेडवर “जय भवानी जय शिवाजी” असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले होते.भीमा कोरेगाव येथील खरा इतिहास युध्दास झालेल्या २०० वर्षापूर्ती निमित समोर आला असता या वर्षी विजयस्तंभा जवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित पुतळे उभे करण्यात आलेले होते.यावर्षी विजयस्तंभाचे खरे आकर्षण छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याचे भगवे निशाण प्रतिक होते.पहिल्यांदाच “समता सैनिक दल” यांचा स्वराज्याचे भगवे निशाण घेऊन मानवंदना मार्च आयोजित करण्यात आलेला होता.आर्य सनातन हिंदू संघटनांना याची खबर लागली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचे तुकडे गोळा करून गोविंद महार याने अंत्यसंस्कार करून त्यांची समाधी महार वाड्यात बांधली.गोविंद महार यांची समाधी समस्त महार यांनी बांधून दोन्ही समाधीची दिवाबत्ती सुरु ठेवली.गेल्या १५ वर्षापासून हिंदू संघटनांनी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी ताब्यात घेऊन समतावादी स्वराज्य रक्षक असलेले छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज केले....त्यामुळे खरा वाद येथून सुरु झाला.यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना समतावादी स्वराज्य रक्षक असे असणारे संभाजीराजे यांचा इतिहास समतावादी म्हणून पुन्हा उभा राहिला आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदल्याचे प्रतिक म्हणून भीमा कोरेगाव याठिकाणी अलुतेदार मोठ्या प्रमाणात मानवंदना द्यायला आले होते.याची भीती आर्य सनातन हिंदू संघटनांना झाली त्यानी पूर्वनियोजित कटकारस्थानुसार ठरवून स्वराज्याचा भगवा ध्वज हातात घेऊन १ जानेवारी २०१८ च्या निघालेल्या “समता सैनिक दल” मार्चवर दगडफेक करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करून मानवंदना मार्च थांबविण्याचा प्रयत्न केला.प्रसंग सावधान म्हणून आलेल्या अलुतेदार यांनी त्या मार्च चे संरक्षण व्हावे हा दुष्टीकोन ठेऊन त्याच्या अवती भवती कडे निर्माण करून एवढ्या दगड फेकीच्या वातावरणात मानवंदना मार्च पूर्ण करून आम्ही गौतम बुद्धांच्या विचारांचे कसे आहोत याचे दर्शन त्या आर्य सनातन हिंदू संघटनांना दाखवून दिले.याची  खबर सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली चळवळीचे कार्यकर्ते आपल्या आई बहिणींचे आणि लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी....त्यांनी भीमा कोरेगाव याठिकाणी कूच केली.दिवसभर रात्रभर जे दगडफेकीत जखमी झाले त्यांची सोय या कार्यकर्त्यानी केली परंतु सदरची बातमीची दखल घ्यायचा मिडीयाने फार उशीर केला.संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्र राज्यात या आर्य सनातन हिंदू संघटनांनवर थू थू करण्यात आली.अलुतेदार यांच्या मनात सदरचा आगडोंब उसळीत होता काय करावे काही कळत नव्हते राग बाहेर काढण्यासाठी जागा शोधत होते....परंतु वाट मिळत नव्हती.कार्यकर्ते प्रशासनाला जाब विचारण्यासाठी एकत्रित बैठका घेत होते.जिल्हाधिकारी यांच्या घरावर जवळ शेकडो कार्यकर्ते उपस्थित होऊन प्रशासनाला जाब विचारीत होते......जे ते पोलिसात तक्रार देण्याच्या प्रयत्नात होते.अखेर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या दंगलीचे प्रमुख दोन व्यक्तीं आहेत असे सांगून त्यातील पहिले नाव मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे तर दुसरे नाव मिलिंद एकबोटे यांना दोषी धरून त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करून समाजाच्या क्रोधाला बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्र बंदचा कॉल दिला संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंद झाला होता.....याचे पडसाद देशात उमटले.परंतु मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे हा व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे गुरु असल्यामुळे आणि मिलिंद एकबोटे हे संघ परिवारातील असल्यामुळे केंद्रसरकार आणि राज्यसरकार यांचेवर संघाची पकड असल्यामुळे प्रशासनावर या दोघांना अटक न करण्याचा दबाव आहे.....त्यामुळे आजपर्यंत दोघांना अटक केली गेली नाही.या दंगली दरम्यान राहुल फटांगळे या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे.या मुलाच्या हत्येचा राजकीय फायदा काही मराठा संघटनांनी घेण्याचा प्रयत्न करून दलित – मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न केला होता.परंतु मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांनी प्रसंग सावधान बाळगून गोविंद महार यांची उध्वस्त केलेली समाधी संगमरवरी मध्ये बांधण्यात येईल अशी घोषणा करून हा वाद दलित - मराठा नसून आर्य सनातन हिंदू धर्मीय गुलामांचा हल्ला असल्याचे बोलून दाखविले.....त्यामुळे सर्व देशासमोर संघ परिवार उघडा पडला असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.या दंगलीचे पडसाद असे उमटले की,छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे झाल्याचे आणि महार समाज योध्दा असल्याचे समोर आलेले आहे.या सर्वांचा उहापोह करून प्रकाश आंबेडकर यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की,जर महार समाजाच्या गळ्यात गाडगे मडके होते...आणि कमरेला झाडू होता तर आमचे सैनिकी प्रशिक्षण कसे कोठे आणि कोणी केले असा प्रश्न इतिहासाला करून महार समाजाचे योगदान स्वराज्यात निश्चित केले आहे.या सर्व प्रकारामुळे एवढे मात्र निश्चित झाले की,स्वराज्याचा इतिहास उजागर होऊन वढू बुद्रुक ते भीमा कोरेगाव हा प्रवास रयते समोर आला आहे.





राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी समाज